राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विधानमंडळामध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर अधिकच चर्चा झालेली असून जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलेला आहे .परंतु राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार व इतर राज्य सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत आनंदाची अपडेट समोर येत आहे .
अधिवेशनांमध्ये कर्मचारी संघटनांकडुन देण्यात आलेल्या विविध प्रश्नावर अधिवेशनांमध्ये चर्चा करण्यात येत असुन , राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे . अधिवेशनांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होण्याबाबत , प्रश्न उपस्थित करण्यात येईल , या करीता प्रशानांकडुन माहीती अद्यापवत करण्यात आलेली आहे .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत काही कर्मचाऱ्यांचा विरोध –
राज्य शासनाच्या वर्ग अ, ब, क मधील पदांसाठी सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे . तर वर्ग – ड करीता सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे . देशांमध्ये केंद्र सरकारने त्याचबरोबर इतर राज्यांनी सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 2 वर्षे वाढ करुन 60 वर्षे करण्यात आले आहे . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे . परंतु काही कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याला विरोध आहे .यामुळे सरकारला ठोस निर्णय घेवू शकत नाही .
दोन वर्षांची मिळेल अतिरिक्त सेवा –
जर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .जे कर्मचारी वयोमानानुसार , उशिरा सेवेत रुजु झाले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल . कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !