Good News : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्याच्या पगाराबाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट ! Gr निर्गमित दि.23.12.2022

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यातील पगाराबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासकीय / जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यातील वेतन विहीत कालावधीमध्ये होण्याकरीता राज्य शासनांकडुन निधींचे वितरण करण्यात आलेले आहे . निधी वितरण करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.23.12.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्याचबरोबर इतर थकित देयके अदा करणेसंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांकडुन निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत . आहरण व संवितरण अधिकारी यांच्या मागणीनुसार ,निधींचे वितरण करण्यात येत आहेत .यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे थकित देयके बाकी आहेत अशा कर्मचाऱ्यांना थकित देयके अदा करण्याकरीता पुरेसा निधी वितरीत करण्यात आलेला आहे .

सदरचा अर्थसंकल्पित निधी हा केवळ ज्या लेखाशिर्षाकरीता देण्यात आलेला आहे . त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .यामध्ये राज्यातील शासकीय , अशासकीय व अनुदानित शाळांना वेतन तसेच इतर बाबी खर्ची करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .सदरचा निधी हा संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या बिम्स प्रणालीवर उपलब्धक करुन देण्यात आलेला आहे .

निधी हा ज्या उद्देशाकरीता मंजुर करण्यात आलेला आहे केवळ त्याच उद्देशाकरीता खर्च करता येणार आहे . अन्यथा वित्तीय अनियमितता समजण्यात येईल .निधी वितरण करणे संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि. 23.12.2022 रोजी निर्गमित झालेा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक , भरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment