विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम , महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम , महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम , महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम , महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम यांचे सुधारणा करण्यासाठीच्या विधेयकास कामगारांकडुन विरोध करण्यात येत आहे .
महाराष्ट्र राज्यांमध्ये किमान घरभाडे भत्ता अधिनियम लागु आहे , राज्यातील 90 टक्के कामगारांना याचा लाभ मिळतच नाही ही वस्तुस्थिती आहे . कंत्राटी कामगार , शिकाऊ कामगार , व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी , नगरपालिका , महानगरपालिका येथे काम करणारे कंत्राटी कामगार या कामगारांना किमान घरभाडे मिळत नाही .
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमावलीतही शिक्षेच्या तरतुदी काढून टाकण्याचे प्रस्तावित आहे . या सभागृहातील काही सदस्य हे सुरक्षा रक्षक एजन्सीचे मालक आहेत . महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे . परंतु 80 टक्के पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक कुठल्याही मंडळामध्ये नोंदी केलेले नाहीत व खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सींना नोंदणी न करण्यासाठी सूट देण्यात आली आहे .प्रत्यक्षात या कामगारांना 12 तास काम काम करुन देखिल किमान ( मिनिमम् ) वेतन / पगार दिले जात नाहीत .PF ,ESI ची चोरी केली जाते , बोनस दिला जात नाही .
या संदर्भात भारतीय ट्रेड युनियन केंद्र औरंगाबाद जिल्हा कमिटी या संघटनेमार्फत प्रेसनोट दि.24.12.2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .या संदर्भातील सविस्तर प्रेसनोट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक ( Employee ) , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉइन व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !