State Employee News : खुशखबर ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ ! राज्य शासनाने घेतला अखेर , मोठा निर्णय.

Spread the love

State Employee News : बुधवारी उपराजधानी नागपूर येथील विधानसभेतून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी ही समोर आली होती. राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात रोष हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. दरम्यान आता शिक्षण सेवकांबाबत एक मोठी बातमी समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना पगारात वाढ देण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 2000 पासून राज्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना त्यांचे पहिली तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून नोकरीं करावी लागते. शिक्षण सेवकाची तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्या संबंधितांना शिक्षक म्हणून कायम केलं जात असते.

सध्या प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांना अवघे नऊ हजार रुपये मानधन हे दिले जात आहेत. विशेष म्हणजे 2011 पासून शिक्षण सेवकांना असाच पगार मिळत आहे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईचा विचार घेता शिक्षण सेवकांना मिळत असणारा हा पगार अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी वारंवार कर्मचाऱ्यांकडून केली आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने देखील शिक्षण सेवकांच्या कमी पगारावर आश्चर्य व्यक्त केलं होतं कारण ही बाब खूप आश्चर्य व्यक्त करणारी आहे.

मात्र शिक्षण सेवकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली असून आता प्राथमिक शिक्षक सेवकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षक सेवकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक सेवकांना २० हजार रुपये मानधन करण्यात येणार असल्याचे निश्चित केलेले आहे. यामुळे निश्चितच शिक्षण सेवकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्मचारी विषयक , सरकारी पदभरती / योजना त्याचबरोबर ताज्या बातमीची नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा.

Leave a Comment