चेहऱ्याचे सौंदर्य आकर्षित दिसण्यासाठी आणि चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती उपाय. चेहऱ्याचे सौंदर्य:प्रत्येकाला वाटते आपण सुंदर आणि गोरे दिसले पाहिजे. त्यासाठी बरेच लोक प्रसाधने वापरतात. ब्यूटी पार्लर मध्ये जाऊन खूप पैसे खर्च करून आपल्या चेहर्यावरचे आकर्षण वाढवतात.
तसेच जाहिरात बघुन दुकानातून क्रीम आणून वापरतात. परंतु या क्रीम मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर होत असल्यामुळे चेहर्यावर त्या क्रीम वापरुन चेहरा आणखी खराब होतो. आपला चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या क्रीम वापराव्यात असे अनेक विचार मनात निर्माण होतात,तर कोणी एकमेकांच्या सल्ल्याने विचारपूस करून त्यांनी सांगितलेल्या क्रीम चा वापर करतात. परंतु असे काहीही न करता काही घरगुती उपाय केले तर चेहरा सुंदर, गोरा,आकर्षित आणि चेहर्यावरील ग्लो वाढविण्यास मदत होते.हे घरगुती उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील :
1)टोमॅटो आणि काकडी:चेहरा चमकदार दिसण्यासाठी टोमॅटो आणि काकडीचा वापर करणे उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी टोमॅटो आणि काकडी कापून ती रात्री झोपण्याअगोदर चेहर्यावर ठेवायची. त्यामुळे चेहरा गोरा आणि सुंदर दिसतो.
2)बटाट्याचा किस:दुसरा घरगुती उपाय म्हणजे बटाट्याचा किस. यामध्ये बटाटा हा पूर्णपणे मिक्सरमधून काढून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून त्याचा पेस्ट तयार करून घ्यायचा. तो पेस्ट चेहर्यावर आणि मानेपर्यंत लावत आणायचा. हा उपाय रोज केल्यास चेहर्यावरचे काळे डाग आणि मानेवरील काळी त्वचा नाहीशी होण्यास मदत होते.
3)पपईचा रस:पपई हे फळ चेहर्यासाठी खूप लाभदायक आहे. पपईचा रस चेहर्यावर चोळायचा आणि सुकत पर्यंत तसाच राहू द्यायचा. चेहरा वाळल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा. त्यामुळे चेहरा गोरा आणि आकर्षित दिसतो, आणि चेहर्यावर चमक सुद्धा येते.
4)कोरफडीचा रस:कोरफडीचा गर आपल्या चेहर्यासाठी खूप उपयुक्त आहे. कोरफडीचा गर काढून तो चेहर्याला लावायचा, लावल्यानंतर चेहरा तसाच राहू द्यायचा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा. परिणामी चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यास मदत होते.
5)अंड्याचा पांढरा भाग:अंडे हे आपल्या चेहर्यासाठी खूप लाभदायक आहे. अंड्यातील पांढरा भाग काढून तो चेहर्यावर आणि काळ्या डागावर लावायचा 15 मिनिट झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा. चेहरा धुतल्यावर चेहऱ्याची त्वचा क्लीन होते आणि काळे डागही कमी होतात.
6)हळद आणि बेसन:हळद, बेसन आणि चंदन ईत्यादी पदार्थ एकत्र करायचे. त्यामध्ये थोडे पाणी किंवा दूध टाकून ते एकजीव करायचे. त्यानंतर ते मिश्रण चेहर्यावर लावून चेहरा सुकू द्यायचा. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज किंवा स्क्रब करीत चेहरा धुवून टाकायचा. या मिश्रणात सर्व पदार्थ हे आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा चेहर्यावर कोणताच वाईट परिणाम होत नाही.
7)मसुरदाळ : मसुराच्या डाळीचे बारीक असे पीठ करायचे. ते पीठ 2-3 चमचे घेऊन त्यामध्ये मध आणि नारळाचे पाणी टाकून त्याचे मिश्रण बनवायचे.,आणि हे मिश्रण चेहर्यावर लावून हलकी मसाज करायची,आणि 10 मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकायचा. यामुळे चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यास मदत होते.
8)गुलाबजल:कापसाचे बोळे तयार करून गुलाब पाण्यात भिजू घालायचे. त्यानंतर 10-15 मिनिट मसाज करायची.यामुळे चेहर्यावर ग्लो येतो आणि चेहरा पण आकर्षित आणि चमकदार दिसतो. अशा प्रकारे चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे घरगुती उपाय करता येतात
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !