NPS धारक कर्मचाऱ्यांना मोठी सवलत ! नविन आर्थिक धोरणांमध्ये तरतुद !

Spread the love

NPS धारक कर्मचाऱ्यांना नविन आर्थिक वर्षांमध्ये मोठी सवलत देण्याची तरतुद नविन आर्थिक धोरणांमध्ये करण्यात आलेली आहे . नॅशनल पेंशन सिस्टिममध्ये गुंतवणुक करणाऱ्या खाजगी कॉर्पोरट कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल लाभ मिळणार आहे .तसेच इतरही अनेक फायदे लागु करण्यात आलेले आहेत .

PFRDA ने अर्थ मंत्रालयामध्ये पाठवलेल्या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहेत कि , सरकारी कॉर्पोरेट कर्मचारी तसेच व्यावसायिकांनाही NPS योगदानावरील 24 टक्के संपुर्ण रकमेवर करसवलतीचा लाभ देण्यात येईल .सध्या NPS वरील 20 टक्के रक्कमच करसवलतीस पात्र होती . यामध्ये वाढ करुन 24 टक्के केल्याने कर्मचाऱ्यांना कर सवलतीमध्ये दिलासा मिळालेला आहे .

PF खात्यावर देखिल कर सुट –

PFRDA चे अध्यक्ष सुप्रितिम बंडोपाध्याय यांच्या मते राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडुन देण्यात आलेले 14 टक्के योगदान करसवलतीस पात्र ठरतो . त्याच पद्धतीने कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखिल अनुज्ञेय करण्यात येईल .त्याचबरोबर आता एनपीएस मधील पीएफची रक्कम 50 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शन म्हणुन 50 हजार रुपयांची सवलत देण्यात प्रस्ताव PFRDA कडुन नमुद करण्यात आले आहे .

कर कायदा 80 CCD –

NPS मध्ये कलम 80 सीसीडी अंतर्गत कर वजावटीची तरतुद करण्यात आलेली आहे .दोन रुपयांच्या मर्यादा पेक्षा अधिक रक्कमेचा योगदान कर्त्यांनी दिलेली योगदान रक्कम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD अंतर्गत सवलतीस पात्र ठरते .

कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment