सध्या देशांमध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापले आहेत . कारण काही राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन परत लागु करत आहेत . पण महाराष्ट्र सारखा आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येत नाही . राज्य सरकारकडुन कारणे दिली जात आहेत कि , जुनी पेन्शन योजना लागु केल्यास , राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत जाईल .
देशातील राज्य कर्मचारी जुनी पेन्शनसाठी मोठा संघर्ष करत आहेत . परंतु जुनी पेन्शन लागु करणेबाबत , काही पार्टी नकारात्मक असल्याने , कर्मचाऱ्यांकडुन जो पेन्शन देईल त्यालाच मत देण्याचा निर्णय घेतला आहे .सध्या देशातील राज्य कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शन मागणी करता आंदोलने , संप , मोर्चा काढले जात आहेत .एकीकडे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करण्यात आली आहे . तर दुसरीकडे लोकप्रतिधींनी आपली स्वत : ची पेन्शन मात्र जुनी पेन्शनप्रमाणेचे चालु ठेवली आहे .
राजकारण्यांनी स्वत : ला जुनी पेन्शन कायम ठेवून आयुष्यभर सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाकारल्याने राजकारण्यांना पेन्शन विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे .या अगोदरही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या . परंतु मागील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने खारिज केली आहे .
कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रमोशन झाले , तरी एकच पेन्शन मिळायची परंतु लोकप्रतिनींच्या बाबतीत तसे नाही . एखादा लोकप्रतिनीधी अगोदर नगरसेवक असेल , त्यानंतर आमदार व त्यानंतर खासदार झाला तर त्या लोकप्रतिनीधीला एक नाही तर तीन वेगवेगळ्या पेन्शन लागु होतात . यावर देखिल मोठ्या प्रमाणात सरकारचा पैसा खर्च होत असतो . याकडे सुद्धा सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे . त्याचबरोबर लोकप्रतिनींना सेवानिवृत्तीनंतर देखिल अनेक सुविधा जसे विमान प्रवास सवलत ,यावर देखिल सरकारचा मोठा खर्च होत असतो .
यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाकारणाऱ्या राजकारण्यांना पेन्शन विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे . या याचिकेला कर्मचाऱ्यांकडुन समर्थन मिळत आहेत .
कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !