Farmer Scheme : सध्या शेती करायची म्हटली तर जमीन पाहिजे, पाणी पाहिजे आणि वीज देखील पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये सध्या विजेचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. असे असले तरी आपल्या राज्यामध्ये अजून शेतकऱ्यांना पुरेशी अशी वीजच उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त आठ तास वीज दिली जाते आणि जास्तीत जास्त वीज रात्रीच्या वेळेस भेटते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी पुरवण्याकरिता बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
मित्रांनो या ठिकाणी मोठे व सधन शेतकरी आहेत ते त्यांच्या बजेटनुसार डिझेल पंपाच्या साह्याने पिकांना पाणी देत असतात त्यामुळे त्यांची पिके जगतात. मात्र सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच गरीब किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील त्यांना ही प्रक्रिया वापरणे शक्य नसते. पण दरम्यानच्या काळात आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आली आहे. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी लागणारी वीज दिवसा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या आणि खाजगी जमिनीवर सोलर पॅनल उभा केले जाणार आहेत आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवली जाईल.
या माध्यमातून जिल्ह्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये 30 टक्के फिडरवर सोलर पॅनल बसवले जातील. हे सोलर पॅनल बसवण्याकरिता शेतकऱ्यांना देखील त्यांची जमीन भाड्यावर द्यावी लागेल. जमिनीच्या मोबदल्यात शासन शेतकऱ्यांना भाडे देईल. या माध्यमातून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना तीस हजार रुपये इतके भाडे मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार 1980 ठिकाणी जवळपास 80 एकर शासनाची जमीन आणि 60 ठिकाणी 900 एकर खाजगी जमीन इतक्या जमिनीवर सोलर पॅनल बसवले जातील. या संबंधित विशेष प्रस्ताव हा जिल्हा अधिकारी यांच्यासमोर करण्यात आला आहे या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जेमधून जे काही वीज निर्माण होणार आहे. ती वीज पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी राहणार.
म्हणजेच मित्रांनो याचा वापर फक्त शेती साठी होईल. मागील तीन वर्षांमध्ये शेतीपंपासाठी सर्व शेतकरी मित्रांना विज ही दिवसा बारा तास देण्याचे शासनाने ठरवले होते. यासाठीच आता सोलर पंप भरण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील 86 ठिकाणी असलेल्या शासनाच्या जमिनी पैकी 56 ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
मात्र ज्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेऊन त्यावर सोलर पॅनल बसवले जातील. याकरिता शेतकऱ्यांना सुरुवातीला पहिल्या वर्षापासून तीस हजार रुपये देण्यात येईल आणि दरवर्षी यामध्ये वाढ केली जाईल.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !