पेन्शनसह इतर लाभ लागु करणेबाबत राज्य सरकार सकारात्मक ! पेंशन , ग्रॅच्युटी सह इतर लाभ मिळणार .

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता नागपुर येथे आंदोलन करत आहेत . काल दि.27.12.2022 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता , कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वासन दिलेले आहेत . यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या अधिकृत्त फेसबुक व Twitter खात्यावरुन कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वस्त केले आहेत .

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिष्टमंडळाने दि.27.12.2022 रोजी भेट घेतली असता , कर्मचाऱ्यांच्या समस्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जाणून घेतल्या . व केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना उचित लाभ मिळवून देण्याबाबत , राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले आहे .

फॅमिली पेंशन , ग्रॅच्युटी सह इतर लाभ –

फॅमिली पेंशन त्याचबरोबर ग्रॅच्युटी सह जुनी पेंशनप्रमाणे मिळणार इतर सर्व लाभ कर्मचाऱ्यांना पुर्ववत लागु करणेबाबत राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या अधिकृत्त ट्टिटर व फेसबुक खात्यावरुन अधिकृत्त पोस्ट शेअर केलेली आहे .

यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे फॅमिली पेंन्शन व इतर लाभ पुर्ववत लागु करण्यात येणार असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काही अंशी यश येत असल्याने कर्मचाऱ्यांची उमेय वाढत आहे .

कर्मचारी विषयक , भरती / सरकारी योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment