Post Office : पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या असतात अनेकजण त्यात गुंतवणुक देखील करत असतात. पोस्टाच्या ऑफिसच्या खूप योजना ह्या प्रसिद्ध देखील आहेत. त्यापैकी ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा ही एक अत्यंत सुप्रसिध्द योजना आहे.
या योजनेत तुम्ही रोज केवळ 95 रुपये वाचवले तर तुम्हाला मिळतील तब्बल 14 लाख रुपये. म्हणजेच जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षातच लखपती होणार.
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा-
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना असे आहे. जर तुम्हाला ही योजना सुरु करायची असेल तर तुमचे वय हे 19 ते 45 वर्षे यामध्ये असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक हा पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि योजनेत 15 किंवा 20 वर्षांचे दोन मॅच्युरिटी कालावधी हे उपलब्ध आहेत.
गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार परिपक्वता कालावधी हा निवडता येतो आणि या योजनेत, गुंतवणूकदाराला 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. योजनेंतर्गत गुंतवणूकदाराला, 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीवर विमा रकमेच्या 20-20 टक्के रक्कम 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत दिले जातात.
गुंतवणूकदाराला 20 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी अंतर्गत, 8, 12, 16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत घेऊ शकता. त्याशिवाय 40% रक्कम परिपक्वतेच्या वेळी बोनससह प्राप्त होते.
समजा तुमचे वय 25 वर्ष आहे आणि जर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी सात लाख रुपयांच्या विमा रकमेसह पॉलिसी घेतली तर महिन्याला तुम्हाला 2850 रुपये प्रीमियम देखील भरावा लागेल (दररोज 95 रुपये बचत) म्हणजेच 6 महिन्यांत तुमची रक्कम 17,100 रुपये इतकी होईल. मॅच्युरिटीच्या वेळी, तुमच्याकडे एकूण रक्कम 14 लाख रुपयांचा निधी हा जमा केला जाईल.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !