राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महीन्याच्या वेतनाचा मार्ग झाला मोकळा !

Spread the love

सोमवार  दि १९/१२/२०२२पासून शालार्थ प्रणाली बंद असल्यामुळे राज्यभरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर च्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने २१/१२/२०२२ ला तातडीने शिक्षण आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांकडे महिला आघाडी प्रमुख श्रीमती वैशाली नाडकर्णी यांना पाठवले होते.त्यांनी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर तांत्रिक कारणे दूर करण्यासाठी काम  अधिक वेगाने सुरू झाले.

तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ही बाब.शिक्षणमंत्री उपसचिव यांना ही कळवली. अनेक वर्तमानपत्रांत ही बाब प्रसिद्ध झाली आहे.नागपूर विभाग शिक्षक परिषद कार्यकर्त्यांना ही बाब नागपूरात. अधिवेशन प्रसंगी अधिकार्यांना कळवली व तसेच शिक्षक परिषदेने पत्र ही दिले.दिनांक २५/१२/२०२२ ला सायंकाळी शालार्थ प्रणाली सुरळीत सुरू झाली आहे .

 त्यामुळे  डिसेंबर च्या वेतन बीलांचे काम वेळेवर होण्यास सहाय्य होणार आहे .वेतन वेळेवर अदा करण्याबाबत शिक्षक परिषदेकडुन कोषागार कार्यालयांना निवेदने देण्यात येणार आहेत . जेणेकरुन कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत कालावधीमध्ये होणार आहेत .याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई , कार्यवाह श्री. शिवनाथ दराडे यांनी माहीती दिली आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment