राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजीचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.12.2022

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाच्या धोरणात सुधारणा करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.28.12.2022 रोजी निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सा.प्र.विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरुन संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण विहीती करण्यात आले आहे , यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट – क पदावरुन आयोगाच्या कक्षेतील गट क च्या पदावर तसेच आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेतील गट क च्या पदावर कायमस्वरुपी समावेशन करता येणार नाही .यासंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी मुळ अर्ज पारीत केलेल्या न्यायनिर्णयाबाबत साधकबाधक विचार करुन सुधारित सुचना देण्याची बाबत राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

वरील पार्श्वभूमीवर संदर्भाधिन दि.15.05.2019 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 ( 1 ) वगळण्यात येत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या पदावर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेतील गट क च्या पदावर कायमस्वरुपी समावेशन , संदर्भाधीन शासन निर्णयात विहती केलेल्या अटी व शर्तींच्या अधिन राहून अनुज्ञेय असणार आहे . परंतु असे कायमस्वरुपी समावेशन करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचार विनियम करणे आवश्यक असणार आहे .

या संदर्भाती सामान्या प्रशासन विभागाकडुन दि.28.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment