राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात थेट अधिवेशनातुन मोठी ब्रेक्रिंग न्युज !

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा नागपुर येथे पेन्शन संकल्प यात्रा सुरु आहे . या संकल्प यात्रेमध्ये लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे , यावरुन कर्मचाऱ्यांची एकता लक्षात दिसुन येते .या संकल्प यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडत नसुन , कायदेशिर मार्गाने कर्मचारी आपली मागणी सरकार समोर मांडत आहेत .संकल्प यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांचा सहभाग पाहुन , सरकारला जुनी पेन्शन योजना लागु करावीच लागणार आहे .

यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ जुनी पेन्शनच्या मुद्द्यावरच गाजत आहे . या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युटी देण्याची घोषणा केली आहे , परंतु कर्मचाऱ्यांचा लढा हा जुनी पेन्शनसाठी असल्याने कर्मचाऱ्यांचा लढा हा सुरु असणार आहे .संकल्प यात्रेमध्ये सर्व जिल्ह्यातुन शासकीय / निमशासकीय व इतर पात्र विभागातील कर्मचारी एकत्र आलेले आहेत .

आमदारांना पेन्शन , तर कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही ? आ.विक्रम काळ यांचा थेट सवाल –

आमदार एक वेळेस निवडुन आल्यास , त्या आमदाराला आयुष्यभर पेन्शन असते , याऊल गत कर्मचाऱ्यांची झाली आहे . कर्मचारी आयुष्यभर नोकरी केल्यास त्याला NPS योजनेमध्ये तुटपंजी पेन्शन मिळते .यावेळी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी नमुद केले कि , आमदारांचे पेन्शन बंद करुन आयुष्यभर नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या अशी भुमिका मांडली .

सरकारी कर्मचारी ( Employee ) विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment