शेतकऱ्यांनो एक मिस कॉल द्या आणि कृषी कर्ज घ्या; ही बँक देत आहे शेतकऱ्यांना एका मिस कॉल वर कृषी कर्ज!

Spread the love

farmers agriculture loan शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येकदा शेतकऱ्यांना काही कारणास्तव पैशाची गरज भासतेच, ह्या गोष्टी वरती विचार करून शासन खास शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याकरिता शासन अनेक कल्याणकारी नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. शासन शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील उपलब्ध करून देत आहे. यासोबतच कर्जाच्या माध्यमातून देखील मदत करत आहे. शासनाने राबवलेल्या या योजना शेतकऱ्यांना खरोखर फायदेशीर ठरत आहेत.

आता शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया ही बँकेच्या माध्यमातून सोपी करण्यात आले आहे. आता फक्त मोबाईल द्वारे मिस कॉल देऊन शेतकऱ्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून कर्ज घेता येणार आहे. लवकरच ही सुविधा शेतकऱ्यांसाठी पुरवली जाईल. यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष या सुविधेकडे केंद्रित आहे या निर्णयाबाबत पंजाब नॅशनल बँकेने त्याच्या ट्विटर हँडलवर अधिकृत ट्विट देखील केले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या कर्जा संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

कृषी कर्जाकरिता अर्ज कशा प्रकारे करायचा?

कर्जाविषयी पंजाब नॅशनल बँकेने संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. देशातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना एकदम सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पंजाब नॅशनल बँकेने सोपी करून दिलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एकदम सोप्या पद्धतीने व माफक अटींद्वारे शेती करिता कर्ज घेता येणार आहे कर्ज घेण्याची प्रक्रिया खालील प्रकारे.

1) 56070 वर ‘Loan’ असे लिहून SMS करा.

2) 18001805555 वर मिस कॉल द्या.

3) 18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.

4) नेट बँकिंग वेबसाइट https://netpnb.com द्वारे अर्ज करा.

5) PNB One द्वारे अर्ज करा.

केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. दोन – दोन हजार रुपयांचे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात या योजनेचा फायदा देशांमधील खरोडो शेतकऱ्यांना होत आहे. यासोबतच मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्य. मातून तीन लाख रुपये पर्यंत कर्ज कमी व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे.

यासोबतच आपल्याला माहीतच असेल की कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन खरेदीवर अनुदान दिले जात आहे या योजना विषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही शासनाच्या https://pmksy.gov.in/ ह्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या व शासनाने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या.

Leave a Comment