सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये 5 टक्के DA वाढीची मिळणार मोठी भेट !

Spread the love

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये 4 % ते 5 % महागाई भत्ताची भेट मिळणार आहे . सध्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचे आकडे माहे डिसेंबर महिन्यापर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत . सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करण्यात येते .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोनदा महागाई भत्तामध्ये वाढ लागु करण्यात येते .माहे जानेवारी व जुलै असे वर्षातुन दोनवेळेस डी.ए वाढ करण्यात येते .माहे जुलै 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4% ची वाढ करण्यात आलेली होती .यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 34 टक्के वरुन 38 टक्के झाला आहे . आता यामध्ये 4 टक्के ते 5 टक्केची वाढ होणार आहे .

मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे . कारण AICPI चे निर्देशांकाचा विचार केला असता , निर्देशांकामध्ये मोठी वाढ झालेली आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना सदर डी.ए वाढ माहे जानेवारी 2023 पासुन लागु करण्यात येईल .याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन हालचाली सुरु झालेल्या आहेत .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment