Strike : जुनी पेन्शनसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी जाणार बेमुदत संपावर ! तीव्र आंदोलन !

Spread the love

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये जुनी पेन्शन योजनांची तरतुद करणे आवश्यक आहे . अन्यथा राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जातील , तसेच कर्मचाऱ्यांकडुन तीव्र आंदोलने करण्यात येईल .असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे सचिव पी.एन.काळे यांनी सांगितले कि , NPS हटाव याकरीता राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल , आवश्यकतेनुसार राज्यभर तीव्र आंदोलने देखिल करण्यात येईल .तसेच माहे फेब्रुवारी 2023 मध्ये NPS धारक कर्मचाऱ्यांचे तालुका / जिल्हास्तरीय मेळावाचे आयोजन करुन जुनी पेन्शनबाबत जनजागृती मोहीम काढण्यात येईल .

संपामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा होणार समावेश –

जर मार्च 2023 च्या अर्थसंल्पिय अधिवेशनात जुनी पेन्शनची तरतुद न केल्यास , राज्यातील सर्व जिल्हा परिषद , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , नगरपालिका , महानगरपालिका , महामंडळातील कर्मचारी एकत्र येवून लढा उभा करणार आहेत . या संपामध्ये राज्यातील 100 टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे .

कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment