Business Idea : फक्त 5,000 रुपयांची गुंतवणूक करून नवीन वर्षात हा व्यवसाय सुरू करा ; होईल चांगलीच कमाई !

Spread the love

Business Idea : येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होईल. या नव वर्षांमध्ये जर तुम्हाला तुमचा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये गिफ्ट बास्केटचा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यातून अप्रतिम कमाई देखील करू शकता.

या व्यवसायाबद्दल विशेष सांगायचे झाले तर या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खूप मोठ्या अशा भांडवलाची गरज नाही. हा व्यवसाय फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांमध्ये तुम्ही सुरू करू शकता आणि सुरुवातीपासूनच तुम्ही या माध्यमातून चांगलेच कमाई देखील करू शकता.

अनेक जण विविध कार्यक्रमात किंवा विविध प्रसंगी गिफ्ट बास्केट खरेदी करतात आणि आता शहरांमध्ये याची मागणी फारच वाढत आहे. कारण की वाढदिवस असो वर्धापन दिन किंवा इतर शुभकार्य असो ह्या प्रसंगी गिफ्ट बास्केट ची मागणी ही वाढत चालली आहे.

जाणून घ्या व्यवसायाबद्दल…

पुढील व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या भेटीच्या वस्तू देण्याकरिता बास्केट बनवले जाते या व्यवसायाबद्दल विशेष सांगायचे झाले तर हे बास्केट तुम्ही अगदी तुमच्या घरी बनवू शकता आणि वेगवेगळे डिझाईन नुसार वेगवेगळ्या किमती त्यावर लावू शकता.

दिवसेंदिवस बास्केटच्या वाढत्या मागणीमुळे आणि कंपनीने गिफ्ट बास्केट बनवायला सुरुवात केली आहे. या माध्यमातून आता खूप बदल देखील झाले आहेत. हा व्यवसाय तुम्ही फक्त आणि फक्त पाच ते आठ हजार रुपये मध्ये सुरू करू शकता.

या वस्तू असतील गरजेच्या…

मित्रांनो जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी गिफ्ट बास्केट आणि बॉक्स रिबन लागणार आहे. यासोबतच रॅपिंग पेपर, सजावटीचे साहित्य, हस्तकला च्या वस्तू ,पॅकेजिंग चे साहित्य, दागिन्याचे तुकडे, तुकडे, स्टिकर, मार्कर, पातळ वायर, वायर कटर, कार्टून्स स्टेपलर, पेपर श्रेडर, कलरिंग टेप व गोंद इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागणार आहे.

असे करा मार्केटिंग…

मित्रांनो तुम्हाला या व्यवसायाचे मार्केटिंग स्वतः करायचे असेल तर तुम्ही एक गिफ्ट बास्केट तयार करा व तुमचा हा नमुना तुमच्या जवळील दुकानांमध्ये सादर करा. तसेच तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर देखील याची मार्केटिंग सहजपणे करू शकता. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या गिफ्ट बास्केट ची किंमत कमी ठेवली किंवा डिस्काउंट दिला तर ती विकण्यास अगदी सोपी जाईल.

Leave a Comment