शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांचे थेट लाभ ! मुख्यमंत्र्याने केली मोठी घोषणा !

Spread the love

शेतकर्‍यांना 15 हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान त्यांना बोनस या स्वरुपात मिळणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे.

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे.नवीन वर्षानिमित्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. शेतकर्‍यांना या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुर येथे हिवाळी अधिवेशन चालू होते. या अधिवेशन मध्ये शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना 15000 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला असून CMO Maharashtra या मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्विटर खात्यात देण्यात आलेले आहे.

2022 या वर्षात शेतकर्‍यांचे खुप मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा करावी असा निर्देश पीक विमा कंपनीला दिला आहे. जे शेतकरी बांधव आर्थिक सहाय्यापासून वंचित राहीले आहे त्यांनासुद्धा नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी.

किती मिळणार बोनस:
हेक्टर 15000 हजार रुपये बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

किती हेक्टर पर्यंत दिली जाणार मदत:
15 हजार रुपये बोनस योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित असावेत अशी अट ठेवण्यात आली आहे.

मदत कशी मिळणार:
शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

Leave a Comment