राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय : अविवाहितांना मिळणार आता मासिक पेन्शन !

Spread the love

राज्य सरकारने अविवाहितांच्या बाबतीत मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे . तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अविवाहीत मुलिंना उदरनिर्वाहासाठी मासिक पेन्शनची सुरुवात करण्यात आलेली आहे .आई – ‍वडिलांच्या निधनानंतर मुलींचे आर्थिक हाल होवून जातात याकरीता राज्य शासनाकडुन मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे .

आमदार डॉ.उमा कापरे यांनी या संबंधी विधान परिषदेमध्ये आई – वडील नसणाऱ्या अविवाहीत मुलींना देखिल पेन्शन देण्याची लक्षवेधी सुचना करण्यात आल्या होत्या . सदर सुचनावर राज्य शासनाकडुन उचित योग्य निर्णय घेण्यात आला असून , राज्यातील अविवाहीत असणाऱ्या व आई – वडिल नसणाऱ्या मुलींना सदर पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

या अगोदर राज्यातील विधवा , घटस्फोटित ,दिव्यांग , मानसिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या मुलींना पेन्शन मिळते , आता यामध्ये भर टाकण्यात आलेली असून , अविवाहीत मुलींना देखिल सदर पेन्शनचा लाभ लागु करण्यात आलेला आहे .सदर निर्णयानुसार लाभ घेण्याकरीता अविवाहित मुलींचे किमान वय 24 वर्षे असणे आवश्यक आहे .राज्य शासनाच्या सदर निर्णयाचे राज्यातुन विविध नागरिक त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडुन कौतुक करण्यात येत आहेत .

Leave a Comment