राज्य शासनाच्या कार्यालयातील कर्मचारी सातत्याने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडुन यापुर्वीच नविन शिस्तपालन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागु करणेबाबत , दि.24.02.2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार दि.29.02.2020 पासुन कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आलेले असुन , सदर वेळांचे पालन करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आलेले आहेत . काही ठिकाणी कार्यालयीन वेळांमध्ये आणखीण संभ्रम असल्याने , नागरिकांकडुन तक्रारी करण्यात येतात . याकरीता राज्य शासनाकडुन नविन शिस्तपालन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .
वरील नमुद शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ही 45 मिनिटांनी वाढविण्यात आलेली आहे . तर शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टीचे दिवस घोषित करण्यात आलेले आहेत .यामुळे राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 मिनिट असे करण्यात आलेली आहे .
तर सर्व शासकीय कार्यालयांतीन शिपाई कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 मिनिटे अशी करण्यात आलेली आहे .तर दुपारच्या वेळी 1 ते 2 या वेळांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासांची भोजनाची सुट्टी अंतर्भूत करण्यात आलेली आहे .यासंदर्भातील सा.प्र.वि दि.24.02.2020 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक ( Employee ) सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp Group मध्ये जॉईन व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !