Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये नविन वर्षांत लक्षणीय मोठी वाढ !

Spread the love

केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत 65 लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे नविन वर्षांमध्ये महागाई भत्तामध्ये मोठी लक्षणीय वाढ होणार आहे . सदरची वाढ माहे जानेवारी 2023 पासुन प्रत्यक्ष लागु होणार आहे , या संदर्भात केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात ..

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन आकडेवारी जाहीर –

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI च्या निर्देशांनुसार जाहीर करण्यात येत असतो , नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन AICPI चे निर्देशांक जाहीर केले असून , माहे नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण 4 टक्के होणार असल्याचे कामगार मंत्रालयाकडुन जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे .माहे नोव्हेंबर पर्यंत AICPI चे निर्देशांक132.5 वर जावून पोहोचले असून माहे डिसेंबर महिन्याचे आकडेवारी अद्याप जाहीर झालेले नाहीत .

एकुण महागाई भत्ता 42 टक्के –

ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता  आता 38 टक्के वरुन 42 टक्के होणार आहे .सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता ( DA ) वाढ वर्षातुन दोनवेळेस वाढविला जातो .यानुसार माहे जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के डी.ए वाढ झाल्यास , एकुण महागाई भत्ता 42 टक्केवर जावून पोहोचणार आहे .

सरकारी कर्मचारी ( Employee ) , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment