Pune Crime : नोकरीचे आमिष दाखवून विवाहित स्त्रीवर बलात्कार !

Spread the love

खूप लोकांना असे वाटते की एखादी नोकरी असली तर आर्थिक सहाय्य मिळते. त्यामुळे काही स्त्रिया ह्या नोकरीच्या शोधात असतात. अशीच एक घटना आहे. नोकरीचे आमिष दाखवून एका 34 वर्षाच्या विवाहित स्त्री वर बलात्कार करण्यात आला आहे.

पुणे: सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तिने पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवून 34 वर्षाच्या
विवाहित स्त्री वर वारंवार बलात्कार केला. तसेच तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली असे त्या महिलेने म्हटले आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी संतोष दत्तात्रय पवार यांच्या विरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक संबंध केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतीत अधिक माहिती अशी, पीडित महिलांच्या घरात काही अंतर्गत वाद सुरू असल्याचा आरोपीने गैरफायदा घेऊन जवळीत साधली. आरोपीने त्या स्त्रीला महानगरपालिका मध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगुन 8 लाख 68 हजार रुपये इतकी रक्कम तिच्या कडून घेतली. तसेच त्या स्त्रीच्या असहायतेचा आणि घरी झालेल्या वादाचा गैरफायदा त्या आरोपीने घेतला. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून डेक्कन पवेलियन होटल या ठिकाणी बोलावून तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवले.

पीडितेबाबतचा हा सर्व प्रकार 2019 ते 2021 या कालावधीत घडत होता. त्या आरोपीने या कालावधीत स्त्रीला नोकरी न लावता तिच्या सोबत लग्न न करता तिची आर्थिक फसवणूक केली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास करत असून , अशाप्रकारे महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

Leave a Comment