Best Business Idea : नवीन वर्षामध्ये सुरू करा हे व्यवसाय! शासन देत आहे पैसे; होईल लाखोंची कमाई !

Spread the love

Best Business Idea : सहसा आज केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबवत आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी याकरिता शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही शासनाने राबवलेल्या या योजनेचा फायदा घेऊन स्वतःचा नवीन व्यवसाय उभा करू शकता आणि ह्या व्यवसायामधून लाखो रुपये कमवू शकता.

मित्रांनो तुम्ही या नवीन वर्षामध्ये स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर आपल्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन तरुण वर्गाला यासोबतच नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये जास्त नफा देणारा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता व्यवसाय तुम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन सुरू करू शकतात.

दूध व्यवसाय..

तुम्हाला माहित आहे का स्वदेशी दुग्धजन्य पदार्थांना भारत देशामध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे ते सुरू करण्याकरिता शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. दुग्धविकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी 25% पर्यंत अनुदान मिळू शकते.

तुम्ही जर आरक्षित खोट्या मधून असाल तर तुम्हाला दहा दहा जनावरांसह दूध व्यवसाय सुरू करायचा असेल. तर तुम्हाला शासन 33% पर्यंत अनुदान देते त्यासाठी तुमच्या प्रकल्पाची फाईल तयार करावी आणि ती फाईल नाबार्डच्या कार्यालयामध्ये दाखवावे.

कुक्कुटपालन

जर तुम्ही आपल्या घराजवळ किंवा घरी मोकळ्या जागेमध्ये चांगला व्यवसाय सुरू करू इच्छिदार असाल तर तर त्या ठिकाणी कोंबड्यासाठी फ्लीट बनवू शकता. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 50% पर्यंत अनुदान उपलब्ध करून देत आहे. याशिवाय मित्रांनो नाबार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी भरघोस असे अनुदान दिले जात आहे ज्याचा फायदा घेऊन तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

मत्स्यपालन व्यवसाय

ग्रामीण भागामध्ये उत्पादन वाढीसाठी मत्स्यपालन हा एक उत्तम असा पर्याय आहे. ग्रामीण भागामधील अनेक शेतकरी बंधू-भगिनी या व्यवसायाकडे वळत आहेत. शासन देखील अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता मत्स्य पालन सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे योजना राबवत आहे.

How to start fish farming business? Learn complete information

शेतकरी मच्छी पालन करण्यासाठी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्याकरिता 60 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे व इतर प्रवर्गातील नागरिकांना 40 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.

Leave a Comment