महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांसाठी नविन वर्षांमध्ये डी.ए चा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . राज्य शासन सेवेमध्ये , कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए बाबतचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .वाढीव डी.ए लाभ हा केंद्र सरकारप्रमाणे लागु करण्यात येणार असल्याने , 6 महिने डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे .
6 महिने महागाई भत्ता फरक –
राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा , निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर माहे जुलै 2022 पासुनच वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधी मधील महागाई भत्ता फरकाची रक्कम अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
केंद्र सरकारने जानेवारी 2023 मधील डी.ए वाढ जाहीर केल्याने , राज्य सरकारकडुन देखिल मागिल जुलै 2022 पासुन थकित डी.ए वाढ बाबत निर्णय घेतला जाईल .वाढीव 4 टक्के महागाई भत्ता व डी.ए वाढीच्या फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये आवश्यक निधींची तरतुद राज्य शासनाकडुन केली जावू शकते .
4% डी.ए वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए 38 टक्के होईल तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासुन 42% दराने डी.ए वाढ मिळणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .
कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !