देशामधील शेतकरी वर्गाला आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. जर कोणाला या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कोणतेही अडचण येणार नाही. ते सरळ किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतील.
किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेण्याकरिता अशाप्रकारे अर्ज करावा.
- ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना सहजपणे किसान क्रेडिट कार्ड माध्यमातून कर्ज उपलब्ध होईल.
- ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण होईल.
- कारण शेतकऱ्यांचा बँक तपशील आधार कार्ड शेताचा तपशील इत्यादी माहिती आधीच मंत्रालयामध्ये नोंद आहे.
- किसन क्रेडिट कार्ड माध्यमातून कर्ज घेण्याकरिता सर्वात आधी एक फॉर्म भरायचा आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला कोणत्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे ते सिलेक्ट करून तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम बँकेच्या वेबसाईटवर जाऊन सेवा पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्ही किसान क्रेडिट कार्ड पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर तुमची जी काही वैयक्तिक माहिती असेल ती त्या ठिकाणी भरायचे आहे.
- किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज हवे असल्यास बँकेशी संपर्क साधून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
- किसान क्रेडिट कार्डसाठी महत्त्वाच्या व आवश्यक अटी काय आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त 75 वर्ष असावे.
- साठ वर्षावरील व्यक्तीस अर्ज करायचा असेल तर सह अर्जदार असणे आवश्यक.
- किसन क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात तीन लाख रुपये पर्यंत कर्ज भेटू शकते.
- कमीत कमी व्याजदर हे चार टक्के पर्यंत असणार आहे.
- शेतकऱ्यांनी व्यतिरिक्त पशुपालन करणारे किंवा दुग्ध व्यवसाय करणारे, शेळी पालन करणारे किंवा कुक्कुटपालन करणारे व्यक्ती देखील या माध्यमातून कर्जाचा चा घेऊ शकतील.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे शेत जमीन असणे बंधनकारक नाही.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !