कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस किंमतीमध्ये मोठी वाढ !

Spread the love

या अगोदर कापुस हंगामाचा विचार केला तर कापसाचा हंगामा असो किंवा अगदी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगला बाजार भावने सुरुवात झाली होती. कालांतराने अनेक अंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडीमुळे कापूस दरात सतत घट होत आहे. जर आपण डिसेंबर महिन्याचा विचार केला तर शेवटच्या आठवड्यामध्ये कापूस दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कापसाचे दर सात हजार ते साडे सात हजार रुपये घट झाली. या सगळ्या घडामोडीचा विपरित परिणाम हा कापूस पुरवठ्यावर होत असताना दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या कापूस दराच्या तुलनेत या वर्षाचे भाव फारच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा असल्याने शेतकरी कापूस विकण्यासाठी आणत नव्हते. याच कारणामुळे कापसाचा पुरवठा सुद्धा विस्कळीत झाला.
परंतू आता अशादायी वातावरण निर्माण झाले असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस हा कापूस उत्पादकासाठी आनंददायी ठरला. डिसेंबरच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये कापसाच्या भावात जे काही वाढ झाली ती काल सुध्दा कायम होती. काल सुद्धा अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव 100 ते 200 रुपयाने वाढले.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस बाजार भावात घट होऊन सरासरी 7000 ते 7500 रुपयापर्यंत घट झाली होती. परंतु शनिवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या दरात थोडी वाढ होऊन दराची सरासरी ही 7300 ते 8700 पर्यंत पोहोचली. काल सुद्धा कापसाच्या प्रति क्विंटल दरामागे 100 ते 200 रुपयाने वाढ नोंदवण्यात आली.

Leave a Comment