Mahavitaran : राज्यात तिन दिवस राहणार वीज पुर्णपणे बंद !

Spread the love

महाराष्ट्र राज्यांमध्ये महावितरण कंपनीचे कर्मचारी दि.04.01.2023 ते 06.01.2023 या 72 तासांच्या कालावधी मध्ये राज्यव्यापी संपामध्ये सहभाग घेणार असल्याने महावितरण कंपनीमध्ये कोणताही कर्मचारी कार्यरत नसणार असल्याने राज्यांमध्ये तब्बल 72 तास विजपुरवठा खंडित होणार आहे . यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झालेली आहे .

महाराष्ट्र राज्याच्या खासगी क्षेत्रामधील कंपन्यांना वीज क्षेत्रांमध्ये परवाना देण्यात येवू नये , ज्यामुळे विजपुरवठा खाजगी कंपन्याकडे जातील याची भिती महावितरण कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वाटत असल्याने , राज्यातील महावितरण कंपनीमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे . या संप काळांमध्ये महावितरण कंपनीने विजपुरवठा सुरळीत ठेवण्याकरीता सेवानिवृत्त कर्मचारी तसेच प्रशिक्षाणार्थी यांची मदत घेणार आहेत .

संपामध्ये सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही – विजपुरठा ही सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने , अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी संप केल्याने नागरिकांचे नुकसान होत असल्यास राज्य शासनाकडुन मेस्मा अंतर्गत कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .

संप काळामध्ये महावितरण कर्मचारी संपावर असल्याने , विज पुरवठा सुरळीत चालु ठेवण्याबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास , नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे .यामुळे राज्य सरकारने याकडे जातीने लक्ष्य देवून कर्मचाऱ्यांच्या समस्या दुर केल्या पाहीजे असे नागरिकांचे म्हणणे आहे .

Leave a Comment