राज्य शासन सेवेमध्ये जे शासकीय कर्मचारी कारणाशिवाय किंवा अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन कार्यालयात अनुपस्थित असतील / राहतील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 32 , 40 व नियम 41 नुसार वैद्यकीय मंडळासमोर तातडीने उपस्थित राहावे लागते .
वैद्यकीय मंडळाने सेवेत रुजु होण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर संबंधित कर्मचारी सेवेत रुजु होत नसेल किंवा संबंधित कर्मचारी वैद्यकीय मंडळासमोर उपस्थित रहात नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांविरद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर विहीत कालावधीत न कार्यवाही न करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यावर संबंधातील जबाबदारी निश्चित करण्याचे हे तत्व नियमांना अभिप्रेत करण्यात आलेले आहेत .
रजेशिवाय अनुपस्थितीबाबत संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा 1979 च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे व ती विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील प्रकरण – 3 मधील परिच्छेद मध्ये नमुद केलेल्या विहीत कालावधीत पुर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या दि.15.09.2005 च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागाकडुन दि.15.09.2005 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .
सरकारी कर्मचारी / भरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !