सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट मिडिया रिपोर्टला हाती लागलेली आहे . ती म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्याच्या डी.ए मध्ये अपेक्षित 4 टक्के वाढ लागु होणार नाही .नुकतेच AICPI चे आकेडेवारी जाहीर करण्यात आलेले असून , सदर आकडेवारींचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के डी.ए वाढ लागु होणे अपेक्षित होते .
परंतु आता केंद्र सरकारकडुन सदर आकडेवारीचा विचार करुन चार टक्के डी.ए वाढ लागु न करता 3 टक्केच डी.ए लागु करण्यात येणार आहे .AICPI चे निर्देशांक 133.5 वर जावून पोहोचलेला आहे , यानुसार डी.ए मध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित होती . परंतु केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 मध्ये 3 टक्केच डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना देखिल बसणार फटका –
केंद्र सरकारने जर जानेवारी 2023 मध्ये 3 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास , राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल केंद्रीय सरकारच्या धर्तीवर 3 टक्केच डी.ए वाढ लागु करण्यात येईल .केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल फटका बसणार आहे .
एकुण महागाई भत्ता 41%
माहे जानेवारी 2023 पासुन केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता लागु केल्यास , जानेवारी 2023 पासुन केंद्रीय त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना एकुण 41 टक्के दराने महागाई भत्ता लागु होईल . डी.ए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .
सरकारी कर्मचारी , भरती / योजना तसेच ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !