राज्य शासन सेवेतील फक्त सेवानिवृत्त / मयत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रोखीने अदा करावयाच्या सातव्या वेतन आयोागाचा तिसरा हप्ता ऑफलाईन सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय यांच्या मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.03 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शिक्षणाधिकारी यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याचे देयके सदर देयके दि.08.01.2023 ते 10.01.2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .तसेच सेवानिवृत्त झालेल्या व माहे फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे देयक ऑफलाईन पद्धतीने स्वतंत्रपणे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या करीता देयकासोबत लेखाधिकारी शिक्षण विभाग यांनी सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतननिश्चिती केलेल्या आयोगाच्य सत्यप्रती व फरक तक्ते सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुत्यु प्रमाणपत्र देयकासोबत सादर करावे लागणार आहे .मयत कर्मचाऱ्यांचे पाचही हप्त्यांचे एकत्रित देयके सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
नियमित वेतन घेत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ऑनलाईन / ऑफलाईन सातवा वेतन आयोग तिसरा हप्त्याची देयके माहे जानेवारी 2022 मध्ये सादर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .या करीता वरिष्ठ कार्यालयाकडुन आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्रपणे सुचना निर्गमित करण्यात येणार आहेत .
या संदर्भातील शिक्षणाधिकारी यांच्या कडुन दि.03.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !