पीएम कुसुम सोलर पंप योजनेवर शासन देणार आता 90% अनुदान! राज्यातील ह्या पाच लाख शेतकऱ्यांना मिळेल योजनेचा लाभ :

Spread the love

केंद्र शासनाने राबवलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा महाळ अभियान योजनेच्या माध्यमातून आता शासन सौर पंपाचे वाटप करत आहे. तुम्ही या योजनेविषयी अधि माहिती घेतलीच असेल. या योजनेला कुसुम योजना देखील म्हणतात. उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेबाबत मागील आठवड्यातच घोषणा केली आहे. तेव्हा विधान परिषदेमध्ये ते बोलत असताना असे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला सौर कृषी पंप उभा करण्यासाठी जे शेतकरी जमीन भाड्याने देतील त्यांना अतिरिक्त भाडे दिले जाईल.

आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांकरिता पुरेपूर ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले आहे. राज्यांमधील जवळपास पाच लाख हून अधिक शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना शासनाने राबवली आहे. विदर्भा मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येईल.

अखंडित आणि न्याय वीज उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाने सुधारणा वितरण क्षेत्रात योजना याशिवाय आर डी एस एस योजना राबवण्याची घोषणा केली असून महाराष्ट्रासाठी 39 हजार कोटी रुपये या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. असे उपमुख्यमंत्री म्हणाले शासनाने उचललेल्या या पावलामुळे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांना चालना मिळेल.

PM-KUSUM

भारतातील शेतकऱ्यांना ऊर्जा सुनिश्चित करून देणे हेच कुसुम सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट आहे. यासोबतच जीवाश्म इंधन नसलेल्या स्त्रोतांपासून देखील विजेची क्षमता 40% ने वाढवण्याचा सन्मान करणे. तर मित्रांनो शेतकऱ्यांना 90% सबसिडीवर पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल.

यामुळे शेतकरी वर्गासाठी ही एक अत्यंत फायदेशीर योजना आहे. याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल. खास महाराष्ट्रासाठी 39 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून शासनाने उचललेल्या या पावलामुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीला चालना मिळेल.

Leave a Comment