LIC Scheme : एलआयसीच्या या योजनेमध्ये 2600 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 50 लाखांचा परतावा !

Spread the love

LIC Scheme : अनेक लोक गुंतवणूक करून आपल्या पुढील भविष्याचे नियोजन करतात. यासोबतच अनेक लोकांना गुंतवणूक नक्की कोठे करावी? याची माहिती नसते. या सोबतच कित्येक लोकांना कोठे गुंतवणूक केल्यास अधिक पैसे मिळतील? हे देखील माहीत नसते. मात्र तुम्हाला माहीतच असेल की; एलआयसी मध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच आपल्या फायद्याचे ठरत आहे.

जर तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही थेट एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळाने भारतातील प्रत्येक वर्गासाठी पॉलिसी राबवली आहे.

एलआयसीच्या या योजनेमध्ये थोडीफार रक्कम गुंतवून तुम्ही स्वतःचे लाखो रुपये उभा करू शकता. ही गुंतवणूक खरोखरच तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्याकरिता फायद्याची ठरेल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जीवन आनंद पॉलिसीचा जो काही प्रीमियम टर्म आहे तो पॉलिसी सारखाच आहे. तुम्ही पॉलिसी लागू होईपर्यंत जी काही गुंतवणूक आहे ती करायची आहे.

तुम्हाला जीवन आनंद पॉलिसी मध्ये खात्रीशीर असा परिपक्वतेचा लाभ दिला जातो. जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीच्या माध्यमातून 125 टक्के पर्यंत लाभ देखील दिला जातो आणि बोनसही लाभ या माध्यमातून मिळतो.

मित्रांनो या पॉलिसीमध्ये कमीत कमी विमा रक्कम एक लाख रुपये इतकी आहे. याला कोणतेही कमाल मर्यादा नाही. या पॉलिसी सोबत तुम्हाला अपघात लाभ रायडर, अपघाती मृत्यू, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर, अपंगत्व रायडर असे चार प्रकार देखील दिले जात आहे.

करावी लागणार इतकी गुंतवणूक :

मित्रांनो तुम्ही जर ही पॉलिसी घेतली तर प्रत्येक महिन्याला 2716 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक महिन्यातला 2716 रुपये किंवा दररोज बघितले तर 90 रुपये जमा करून मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 50 लाख रुपये मिळू शकतात. याकरिता तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक नक्कीच करावी लागणार आहे.

तुम्ही एकूण 35 वर्षापर्यंतच्या मॅच्युरिटीचा कालावधी या माध्यमातून निवडू शकता. दरमहा 2716 रुपये इतकी रक्कम जमा करून तुम्ही वार्षिक बत्तीस हजार सहाशे रुपये इतकी रक्कम जमा करू शकता. एकूण पस्तीस वर्षासाठी या योजनेमध्ये तुम्ही रक्कम जमा केली तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 50 लाख रुपये मिळतील.

बोनसही मिळेल

35 वर्षांमध्ये एकूण 11 लाख रुपये जमा केले तर त्यामध्ये मूळ विमा रक्कम दहा लाख रुपये असणार आहे. यासोबतच रिविजनरी बोरस हा 17 लाख रुपये असणार आहे. याशिवाय 23 लाख रुपयांचा अंतिम आवृत्ती बोनस या माध्यमातून दिला जाणार आहे.

या पॉलिसीच्या माध्यमातून दोन वेळा बोनस मिळतो परंतु याकरिता पॉलिसी ही पंधरा वर्षे जुनी असली पाहिजे. ही पॉलिसी मृत्यू लाभाचा देखील लाभ घेत असते. जर मॅच्युरिटीपूर्वीच पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनीला विम्याच्या इतके पैसे देखील दिले जातात. परंतु पॉलिसीधारकाचा त्याच्या मॅच्युरिटी नंतरच मृत्यू झाला असेल तर मग नॉमिनीला संपूर्ण रक्कम या माध्यमातून दिली जाते.

Leave a Comment