राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर 21 मे 2020 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लाभ देणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

राज्य शासनाच्या दि.19.03.2005 च्या शासन निर्णयान्वये शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीकरीता आकस्मिक तसेच गंभीर आजारांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर आकस्मिक आजारांमध्ये कोविड -19 या नविन आजाराचा समावेश करण्यात आला आहे .

सदर यादीतील आकस्मिक आजारांमध्ये म्युकरमायकोसीस या आकस्मिक आजाराचा नव्याने समावेश करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .यानुसार म्युकरमायकोसीस या नविन आजारांचा समावेश आकस्मिक आजांच्या यामध्ये करण्यात आला आहे .सदरचे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.71 दि.16.12.2022 नुसार निर्गमित करण्यात येत आहेत .

सदरचा शासन निर्णयातील तरतुदी राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 21 मे 2020 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात आलेले आहेत .यामुळे राज्यतील कर्मचाऱ्यांना 21 मे 2020 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .सदर दिनांकापासुनचे वैद्यकीय देयकाच्या प्रतिपुर्तीकरीता आता कर्मचाऱ्यांना कोषागांरामध्ये देयके सादर करता येणार आहेत .

यामुळे राज्य शासकीय / इतर पात्र तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे . सरकारी कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment