महिलांना घरी बसून करता येणारे टॉप 10 व्यवसाय ! जाणून घ्या या टॉप 10 व्यवसायाबद्दल !

Spread the love

जगभरात महिला पुरुषांसारखे काम करत आहे. परंतू भारताचा विचार केला तर काही महिला घरी बसून आपली गृहस्थी चालवत आहे.महागाई वाढत असल्यामुळे पती-पत्नी या दोघांनीही नोकरी करावी लागते. परंतू काही महिला घरीच्या जबाबदारीमुळे घरा बाहेर पडून नोकरी करू शकत नाही किंवा उद्योग करू शकत नाही. घरातील खर्चाला हातभार लावावा आणि आर्थिक परिस्थिती चांगली असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा वेळेस आपण घरी बसूनच काही उद्योग चालु करू शकतो. अनेक व्यवसाय आहे जे महिला उरलेल्या वेळेत करू शकते. काही व्यवसायाला प्रशिक्षणाची गरज नसते तर काही व्यवसाय आपल्या शिक्षणाच्या आधारावर करू शकतो. परंतू त्यासाठी त्या क्षेत्रातील शिक्षण झाले असायला पाहीजे.

घराच्या घरी व्यवसाय सुरू करत असताना महिलांनी त्याची कौशल्य आणि त्यांना नक्की काय करायचे आहे हे पहिले ठरवून घेतले पाहिजे. तसेच आपल्याला उपलब्ध असणारा वेळ, जागा, व्यवसायासाठी लागणारा खर्च आपल्या जवळ असलेली साहित्य याचा विचार करायला पाहिजे.

1) फॅशन डिझायनिंग:
खुप महिलांना शिवनकाम येते आणि विविध प्रकारचे फॅशनचे कपडे शिवता येतात. काही महिलांना हे काम येत नसले तरी काही महिला आकर्षित पद्धतीने डिझाईन करू शकते. कपडे, दागिणे या महिलांना आवडत असणार्‍या वस्तु आहे. तुम्ही हा उद्योग घरी बसून केल्यास तुम्ही घरी बसून चांगली कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरातील एका छोट्या जागेत सुद्धा करू शकता. सुरुवात करताना मित्र मंडळी नातेवाईक यांच्यापासून करू शकता. व्यवसाय चांगला चालला तर स्वतःचा ब्रांड बनवून व्यावसायिक पातळीवर उद्योग करू शकता.

2) डे केअर सेवा:
शहरी भागातच नाही तर आज ग्रामीण भागामध्ये देखील डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची जास्त आवाड आहे अशा महिला त्यांच्यासाठी डे केअर सेंटर हा व्यवसाय चालू करू शकतो. नोकरदार महिला आपल्या मूलांना घराच्या सारखे वातावरण मिळावे आणि मायेने तसेच आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन मुले सांभाळली जातील अशा पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरी बसून हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरतो. घरात थोडी रिक्त, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तिथे हा व्यवसाय चालू करता येते. मूलांना खेळायला थोडे खेळणे, त्यांना झोपायला व्यवस्थित जागा असायला पाहीजे. थोडी गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही किती मुले सांभाळू शकता यावर तुमची होणारी कमाई आहे.

3) लहान मुलांसाठी छंद वर्ग:
तुमच्या अंगात कला कौशल्य आहे आणि तुम्हाला लहान मुलांची आवड आहे तसेच शिकवण्याची कला आत्मसात असेल तर लहान मुलांसाठी छंद वर्ग चालवणे हा एक चांगला फायदेशीर व्यवसाय आहे. नवीन पालक नोकरी मध्ये गुंतले असल्यास ते मूलांना वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या मध्ये असलेल्या कलाचा उपयोग करून छंद वर्ग हा व्यवसाय चालू करू शकता. गोष्टी सांगणे, हस्तकौशल्य वस्तु बनवने, रंगकाम, मुलांच्या कल्पनाशक्तिला वाव देणारे लिखान, कातरकाम, चित्रकला असे अनेक छंद वर्ग घेता येते. घरात दिवस भरात कोणत्याही सोयीच्या वेळात हे वर्ग घेता येतात. यासाठी खास प्रशिक्षणाची गरज नाही.

4) ई कॉमर्स वस्तु विक्री:
ई कॉमर्स या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. तुमच्यातील कला किंवा तुम्ही बनवलेल्या वस्तु, पदार्थ घरोघरी जाऊन विकण्यापेक्षा ई कॉमर्सची मदत घेऊन तुम्ही अशी विक्री करू शकता. Amazon, फ्लिपकार्ट, यासारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा ETSY यासारख्या अनेक ई कॉमर्स साईटवर तुम्ही उत्पादनाचे डिस्प्ले करू शकता. साबन,मेणबत्त्या होममेड पदार्थ ,पेंटिंग्स असे अनेक प्रकार यामध्ये येतात.

5) अर्बन लॅण्डस्केप:
तुमच्याकडे सौंदर्यदृष्टि आहे आणि निसर्गाची आवड आहे तर अर्बन लॅण्ड स्केप आर्टिस्ट म्हणून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आजकाल शहरात,महा नगरात सर्वत्र सिमेंटची जंगले आहे. घरात सोसायटी परिसरात तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करून हिरवे कोपरे निर्माण करू शकता. मुंबई, बंगलौर यासारख्या शहरात व्यावसायिक गार्डनला खुप मागणी आहे.

6) फ्री लान्स रायटिंग:
तुमच्यात लेखन कौशल्य असेल एखाद्या विषयाची मागणी तुम्ही आकर्षकपणे करू शकत असाल तर फ्री लान्स रायटिंग हा महिलांना घर बसल्या कमाई करून देणारा व्यवसाय आहे. आजकाल ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कैप्शन लिहून देणे, जाहिरात मजकुर लिहून देणे असे काम खाली वेळात करू शकता. 1 शब्दाला 1 रुपया असे दर आकारले जातात.

7) कुकरी क्लासेस:
सर्व महिला स्वयंपाक बनविण्यात पारंगत असतात. ज्या महिलांना विविध पदार्थ बनविण्याची आवड आहे त्या महिला हा व्यवसाय चालू करू शकतात. या व्यवसायात गुंतवणूक खुप कमी लागते. पदार्थ तयार करून देण्याआधी तुम्ही व्यवसायाची सुरुवात छोटे छोटे कुकिंग क्लास घेऊन करू शकता. यासाठी सुरुवातीला 20 ते 30 हजार रुपये गुंतवणूक करून त्यामधून 30 ते 40 टक्के नफा कमाऊ शकता.

8) मेणबत्त्या बनविणे:
आजकाल नवीन घरात जाताना म्हणजेच गृहप्रवेश, वाढदिवस, गेट टुगेदर काही सामाजिक कार्यक्रम यांच्या निमित्त भेट वस्तु देण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही आकर्षक, विविध रंगी, विविध डिझाईनच्या मेणबत्त्या तयार करू शकता. यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो .

9) ज्वेलरी मेकिंग:
तरुण, मध्यम वर्ग महिला यांच्यात खुप फैशन आणि स्टाइल याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्वेलरी मेकिंग हा घरी बसुन उद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांना चांगला पर्याय ठरू शकतो. या व्यवसायासाठी 20 हजार रुपये गुंतवणूक करून 5 ते 15 टक्के नफा कमाऊ शकता.

10) आहार सल्ल्या देणे:
धावपळीच्या शैलीमुळे अनेक लोकांना आपल्या आरोग्याकडे पाहायला वेळ मिळत नाही. तुम्ही आहारशास्त्राचे शिक्षण घेतले असले तर तुम्ही हा व्यवसाय घराच्या घरी बसून चालू करू शकता. तुम्हाला एकदा व्यवसायात गती मिळाली तर तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा कमाऊ शकता.

Leave a Comment