सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका ! आता नविन नियमानुसार घरभाडे भत्ता ( HRA ) ‍मिळणार नाही .

Spread the love

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता नियमामध्ये बदल केला आहे .नविन सुधारित नियमानुसार आता काही कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) मिळणार नाही .वास्ताव्याच्या ठिकाणानुसार व वेतनश्रेणीनुसार घरभाडे भत्तामध्ये विभागणी केली जाते . शहरी भागांमध्ये जास्त तर ग्रामीण भागामध्ये कमी घरभाडे दिला जातो .

अशा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही HRA –

जर सरकारी कर्मचारी एखाद्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांसोबर घर शेअर करत असेल अशा प्रसंगी घरभाडे भत्ता ( HRA ) मिळणार नाही .त्याचबरोबर कर्मचारी त्यांच्या आई – वडील / मुलगा / मुलगी यांच्या सरकारी घरांमध्ये वास्तव्यास असतील व घरभाडे भत्ताचा लाभ घेत असतील अशा कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आता बंद होणार आहे .यामध्ये केंद्र सरकारी / राज्य सरकारी , स्वायत्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच निम सरकारी संस्थांचे कर्मचारी महापालिका , पोर्ट ट्रस्ट , राष्ट्रीयकृत्त बँक , एलआयसी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .

त्याचबरोबर जर सरकारी कर्मचाऱ्यांचे पती / पत्नी सरकारी सेवेमध्ये असतील व दोघे एकाच सरकारी घरांमध्ये वास्तव्यास असतील अशा प्रसंगी वरील नमुद केलेल्या कोणत्याही सरकारी संस्था काम करत असतील अशा कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार नाहीत .

सरकारी कर्मचारी ,शासकीय योजना व भरती तसेच ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment