अखेर महाराष्ट्र बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या तब्बल 20,186 पदांसाठी मेगाभरती जाहीर ! सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .

Spread the love

राज्यात 20 हजार 186 पदाची अंगणवाडीमध्ये भर्ती निघाली आहे.त्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,मिनी अंगणवाडी अशा पदाची लवकरच भर्ती सुरू करण्यात येणार आहे. तसेच मानधन वाढविण्यासाठी नवीन मोबाइल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग इत्यादी विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितिमध्ये आज “वर्षां” निवासस्थानी बैठक घेण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिति,अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध संघटना-समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरक्कमी लाभ योजनेसाठी एलआयसी कडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. लहान मुलांसाठी शाळेची आवाड निर्माण करणारी केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे या दुहेरी भूमिकेत असणार्‍या गावोगावाच्या अंगणवाड्यात असणार्‍या रिक्त पदाचा प्रश्न आता सुटणार आहे. अंगणवाडी सेविका,मदतीनीस यांची रिक्त पद भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता.11 जानेवारी 2023 रोजी)मान्यता दिली. हे रिक्त पद भरल्यानंतर या कामकाजाला पुन्हा चालना मिळणार आहे.

गावोगावात बालकासाठी महिलांच्या दृष्टिने अंगणवाडीचे काम आजही महत्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकाच्या 179, मदतीनीस738, मिनी अंगणवाडी सेविकाच्या 22 जागा रिक्त आहे. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालूक्यातील दोन्ही प्रकल्पाची प्रकल्प अधिकार्‍यांसह 99 पदे रिक्त आहे. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळीतपणा येऊन कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कामाचा मोठा ताण पडत आहे.

Leave a Comment