Good News : राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारप्रमाणे 41% दराने महागाई भत्ता वाढ !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्य शासकीय तसेच इतर पुर्णकालिन कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 41 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय नुकतेच राज्य शासनाकडुन निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत डी.ए फरकासह रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य सरकारने देण्यात आलेले आहेत .त्यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 38 टक्के डी.ए वाढ लाभ अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .

आता मिळणार केंद्र सरकारप्रमाणे 41 टक्के डी.ए वाढ –

नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन माहे डिसेंबर महिन्यापर्यंतचे AICPI चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले असून , सदर निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून आणखीण 3 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल तात्काळ महागाई भत्ता वाढ लागु करण्याची मागणी विविध राज्य कर्मचारी संघटनांनी केली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारप्रमाणे 41 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment