Thane : सेक्स रॅकेट चालविणारीच महिला दलाल ! तब्बल 30 हजार मध्ये करत होती मुलींचे सौदा !

Spread the love

गरीब, गरजू महिला तसेच तरुणीना पैशाचे आमिष दाखवून त्यांना शरीर विक्रेत्याच्या व्यवसायात आकर्षित करणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.

ठाण्यातील घोडबंदर रोड भागातील लॅरिडा हाॅटल परिसरात एक 28 वर्षीय दलाल महिला काही तरुणीकडे शरीर विक्रेत्याचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, एस.व्ही. सोननीस,डी.व्ही. चव्हाण,भोसले, डी.के.वालगुडे, हवालदार पी.ए.दिवाळे आणि अंमलदार आर.व्ही.कदम इत्यादी पथकाने 12 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून यातील दलाल महिलेला गाठले.

मुंबईतील अंधेरी भागातून आलेल्या या दलाल महिलेने 30 हजारांमध्ये एका महिलेचा सौदा केला. तिच्या सोबत तिने 2 महिला आणल्या होत्या. तिला ही रक्कम दिल्यानंतर तिने त्यातील 5 हजार रुपये दोन्हीपैकी एका महिलेला तर 25000 हजारांची रक्कम स्वतःकडे ठेवली. या बनावट ग्राहकाने या सर्व प्रकाराबाबतचा इशारा केल्यानंतर पोलिसाच्या पथकाने धाड टाकून दलाल महिलेला ताब्यात घेतले.

तिच्या विरुद्ध पीटा कायद्यानुसार राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिला राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून तिच्या तावडीतून 25 ते 28 वर्षीय 2 महिलांची सुटका केली आहे. त्याची सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर हे करीत आहे.

Leave a Comment