सरकारी योजना : या सरकारी योजनेत फक्त 44 रुपये बचत करून मिळवा 27.60 लाख रुपये !

Spread the love

एलआयसी ग्राहकांसाठी खुश खबर आली आहे. एलआयसी जीवन विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता. ही एक योजना तुमच्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित करू शकते. ही जीवन विमा पॉलिसी तुम्हाला सुरक्षित नफा कमवून देऊ शकते. एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी “जीवन उमंग पॉलिसी ” ही एक विशेष योजना चालू केली आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून अप्रतिम परतावा कमाऊ शकता.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी:
एलआयसी जीवन उमंग पॉलिसी ही इतर योजनापेक्षा अनेक बाबतीत वेगळी मानली जाते. या योजनेत 90 दिवसापासून ते 55 वर्षापर्यंत लोक गुंतवणूक करू शकतात. जीवन उमंग पॉलिसी ( Jeevan Umang Police ) ही एंडोमेंट योजना असून यामध्ये लाइफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी व्याजासह रक्कम परत देण्यात येते .दुसरीकडे पॉलिसी धारकांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा नॉमिनीला एकरकमी परतावा रक्कम दिली जाईल.

मॅच्युरिटीवर मिळेल मोठा परतावा:
जीवन उमंग पॉलिसी मध्ये तुम्ही दर महिन्याला 1202 रुपये प्रीमियम जमा केल्यास एका वर्षात तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 15,298 रुपये होईल.जर तुम्ही जीवन उमंग पॉलिसी मध्ये 30 वर्षासाठी गुंतवणूक करत राहीलात तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 4.58 लाख रुपये होईल.


तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर LIC कंपनी तुम्हाला 31व्या वर्षांपासून दरवर्षी 40 हजारांचा व्याज परतावा तुमच्या बँक खात्यात जमा करेल.ही योजना तुम्हाला योजनेच्या 31व्या वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत वार्षिक 40 हजार व्याज परतावा देत राहील. अशाप्रकारे तुम्हाला एकूण 27.60 लाख रुपये परत मिळतील.

टर्म रायडरलाही मिळणारा फायदा:
एलआयसी जीवन उमंग पॉलिसी मध्ये पैसे लावत असणार्‍या गुंतवणूकदारांचा अपघाती मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला टर्म रायडर बेनिफिट लाभ दिला जाईल.
शेयर बाजारातील जोखमीचा या योजनेतील गुंतवणूकीवर कोणताही परिणाम होणार नाही.

या पॉलिसीचा परिणाम एलआयसीच्या नफा-तोट्यावर होतो.
ही पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला आयकर कायद्या कलम 80C अंतर्गत कर सवलत लाभ मिळेल.
जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल.

Leave a Comment