सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! बजेटनंतर पगारात होणार मोठी वाढ ! जाणून घ्या आत्ताची सविस्तर अपडेट .

Spread the love

केंद्र सरकारचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीताचे बजेट दि.01.02.2023 रोजी लोकसभेत सादर होणार आहे . या बजेटनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे .सदर बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट वाढीवर मोठा भर दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे .

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट वाढीमुळे 18 हजार रुपये वरुन चक्क 26 हजार पर्यंत वाढ होणार आहे . सध्याच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर लागु आहे . यानुसार सध्या 18 हजार रुपये मुळ वेतन कर्मचाऱ्यांना लागु आहे . यामध्ये 3.68 टक्के वाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियन कडुन करण्यात आलेली आहे .3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढीनुसार विचार केला असता , केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 26 हजार रुपये होईल .

फिटमेंट फॅक्टर वाढीच्या मागणीवर केंद्रीय कर्मचारी युनियने मोठ्या प्रमाणात जोर धरत असल्याने , सन 2023-24 या आर्थिक वर्षााच्या बजेटमध्ये केंद्र सरकारकडुन आवश्यक ती तरतुद करण्यात येईल .ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात त्याचबरोबर इतर देय वेतन व भत्ते मध्ये मोठी वाढ होणार आहे .परंतु डी.ए मधील वाढ ही पुन्हा शुन्य होईल .परंतु एचआरए मध्ये मोठी वाढ होईल .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती प्रक्रिया , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment