राज्य कर्मचाऱ्यांना 41% दराने DA वाढ लाभ ! शासनाचा मोठा निर्णय .

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आणखीण 3% DA वाढीचा लाभ मिळणार आहे . याबाबत राज्य सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात येणार आहे .सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यापासून आणखीण तीन टक्के DA वाढीची घोषणा केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एकूण 41 % दराने महागाई भत्ता लाभ मिळणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार अजून 3% DA वाढ –

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आत्ताच 4% DA वाढीची घोषणा केली असून , जानेवारी महिन्याच्या वेतन देतका सोबत वाढीव 4% DA रोखीने अदा करण्यात येणार आहे .यातच आता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 3% वाढीव DA चा लाभ मिळणार आहे .राज्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव DA चा लाभ तात्काळ राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा .

राज्य कर्मचाऱ्यांना DA चा लाभ नेहमीच उशिरा लागू करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत त्या कालावधी मध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो .कर्मचाऱ्यांना केंद्रीय कामगार मंत्रालय मार्फत निर्गमित झालेल्या AICPI निर्देशांक नुसार जानेवारी व जुलै ची DA वाढ तात्काळ लागू केल्यास राज्य कर्मचाऱ्यांना तत्कालीन महागाईचा सामना करता येईल .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्याच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment