राज्य कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन योजना ! पेन्शन लागु करण्यासाठी राज्य सरकारीची प्रस्तावाची तयारी !

Spread the love

सध्या जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ चालुच आहे . कारण राज्यांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत . यामध्ये आपल्या पक्षाला मत मिळावे याकरीता सर्वच पक्ष आपल्या आपल्या परिने शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत .यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे शक्य आहे .

हिमाचल प्रदेश राज्यांनी नुकतेच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिलेली आहे . हिमाचल प्रदशे राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मुद्दयावर काँग्रेस पक्षांने निवडणुका जिंकल्या होत्या . यामुळे काँग्रेस पक्षाने सत्तेच येताच लगेच जुनी पेन्शन योजना बाबत ठराव करुन जुनी पेन्शन योजना पुर्वीलक्षी प्रभावाने लागु केली .

जुनी पेन्शन लागु करण्याची राज्य सरकारची तयारी – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथे बोलताना म्हटले कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ केवळ भारतीय जनता पार्टीच देवू शकेल . याकरीता सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले . त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागु केल्यास , राज्यातील इतर घटकांवर परिणाम होणार नाही .याचीही काळजी घ्यावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे .

यामुळे राज्यात जुनी पेन्शनला जो पक्ष साथ देईल त्याच पक्षा राज्य कर्मचारी वर्ग साथ देईल . यामुळे राज्य सरकार देखिल या विषयावर अधिक गंभीरपणे विचार करत आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी लवकरच पुर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment