घोषणा करुनही राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा धोका ! GR देखिल निर्गमित दि.16.01.2023

Spread the love

राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युएटीचा लाभ देण्याची मोठी घोषणा केला असता , देखिल NPS योजना लागु असणाऱ्या सेवा कालावधीत मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युएटीचा लाभ लागु न करता परत NPS योजनाप्रमाणे लाभ देणेबाबत राज्य शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाकडुन दि.16.01.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर सेवेत नियुक्त झालेला राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाच्या अधिनस्त व्यवसाय शिक्षणाकडील मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के  अनुदानित पदवरील तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना  / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे असा कर्मचारी 10 वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यु पावल्यास , त्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस , नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशिर वारसास सानुग्रह अनुदान म्हणून रुपये 10 लाख  अधिक कर्मचाऱ्याच्व्या खाती जमा असलेली संचित रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे .

परंतु राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना दिलेल्य आश्वासनानुसार , सदर सेवेत मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना फॅमिली पेन्शनचा लाभ देणे आवश्यक होते . परंतु सदरचा शासन निर्णय काढून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना परत एकदा मोठा धोका दिला आहे .म्हणजेच घोषणा करुन देखिल राज्य सरकारकडुन फॅमिली पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात येत नाही .

या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच रोष आणखीन वाढला आहे . सदर कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुन्या पेन्शन प्रमाणे फॅमिली पेन्शन अनुज्ञेय करुन ग्रॅज्युएटीचा लाभ अनुज्ञेय करणे अपेक्षित होते . परंतु राज्य सरकारने तसे न केल्याने घोषणा देवूनही राज्य सरकारकडून निर्णयांची अमलबजावणी केली जात नाहीये . या संदर्भातील राज्य सरकारकडून दि.16 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्र. 202301171301324003 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment