HRA : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा झटका ! घरभाडे भत्ता ( HRA ) नियमांमध्ये मोठा बदल !

Spread the love

वित्त मंत्रालयाच्या सुधारित नियमांनुसार आता काही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्तापासुन मुकावे लागणार आहे .या संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडुन सुधारित नियम जारी करण्यात आलेले आहेत .नेमेक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना HRA मिळणार नाही याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..

ज्या वेळी एकाच सरकारी घरांमध्ये दोन कर्मचारी कर्मचारी शेअरींग करुन वास्तव्य करत असतील अशा कर्मचाऱ्यांना आता यापुढे घरभाडे भत्ता लाभ मिळणार नाही .त्याचबरोबर एकाच घरांमध्ये आई , वडील , मुलगा – मुलगी एकाच घरात रहात असतील व ते सरकारी सवेत असतील अशा वेळी त्यांपैकी एकालाच घरभाडे भत्ता लाभ मिळेल . परंतु वाहनभत्ताचा लाभ प्रत्येकाने अनुज्ञेय राहील . यामध्ये सदरचा केंद्र , राज्य त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्र महानगरपालिका , राष्ट्रीयकृत्त बँक अशा कर्मचाऱ्यांना सदर नियमावली लागु असणार आहे .

सदर नियमांचे पालन करणे सर्व कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असणार आहेत , जर कोणी कर्मचारी सदर नियमांचे पालन करत नसेल अशा कर्मचाऱ्यांवर कायदेशिरपणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीन गटात विभागले आहेत . यामध्ये मेट्रो शहरांमध्ये सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 24 टक्के दराने तर शहरी भागांमध्ये 16 टक्के व ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8 टक्के घरभाडे भत्ताचा लाभ मिळत आहे .

सरकारी कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment