राज्‍य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारणा करण्यात आलेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.01.2023

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत ,प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांकडुन दि.17 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सार्वजनिक आरोग्य विभागाचा या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता , वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीस मंजुरी देण्याच्या विभागप्रमुखांच्या वित्तीय अधिकारात सुधारणा करण्यात आलेली आहे . यापुर्वी मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना रुपये 3 लाख रुपये  वरील  प्रकरणे मंजुर करण्याचा अधिकार होता आता यामध्ये सुधारणा करुन , 5 लाख रुपये वरील प्रकरणे मंजुर करणे अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .त्याचबरोबर विभागप्रमुखांना यापुर्वी 3 पर्यंतची प्रकरणे मंजुर करण्याचा अधिकार होता , आता यामध्ये सुधारणा करुन तीन लाख रुपये वरील प्रकरणे व पाच लाख रुपये पर्यंतची प्रकरणे मंजुर करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे .

त्याचबरोबर प्रादेशिक विभागप्रमुखांना यापुर्वी 2 लाख रुपये पर्यंतची प्रकरणे मंजुर करण्याचा अधिकार होता , तर आता सदर निर्णयान्वये , सुधारणा करुन सदची मर्यादा 3 लाख रुपये करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन दि.17.01.20223 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment