राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन योजना ! महामंडळ घेणार लवकरच मोठा निर्णय !

Spread the love

राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे आणि फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.काही महिन्याअगोदर 75 वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरवात केली. त्यानंतर आता जेष्ठ नागरिकांना सरकारकडून राज्यभरात मोफत देवदर्शनाची सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील जेष्ठ नागरिकांना देवदर्शन करता यावे यासाठी हा मेगाप्लॅन प्लॅन आखला जात आहे.

जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन :
राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन या मेगाप्लॅनसाठी मुख्यमंत्री यांना महामंडळाची साथ लाभणार आहे. राज्यात एक कोटीच्या जवळपास जेष्ठ नागरिकांची संख्या आहे. या नागरिकांना देवदर्शन करून आणण्यासाठी तब्बल 2 हजार गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.या नवीन नवीन योजनांचा एसटी महामंडळाला निश्‍चितच फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्रात 65 वर्षाच्या वर असलेल्या नागरिकांना टिकिट दरात 50 टक्के सवलत मिळत आहे तर 75 वर्षीय नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

मोफत देवदर्शन योजना कशी असेल:
मोफत देवदर्शन या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक प्रवाशांना अष्टविनायक,गाणगापूर,तुळजापूर,पंढरपूर,अक्कलकोट,कोल्हापुर, शिर्डी, शेगाव,ज्योतिबा या देवस्थानांना जाता येणार आहे.फक्त शनिवार आणि रविवार याच दिवशी जेष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.स्थानिक डेपोमधून प्रवाशांना या सहलीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

राहण्या-खाण्याची व्यवस्था संबंधित देवस्थानामार्फत करण्यात येईल अन्यथा प्रवाशांना स्वतःचाल खर्च करावा लागणार आहे. धर्मशाळा,राखीव निवासात खोल्या राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे.

Leave a Comment