राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय : पेन्शनमध्ये मोठी वाढ , थकबाकीची रक्कम देखिल मिळणार ! GR दि.19.01.2023

Spread the love

राज्य शासनाने निवृत्तीवेतनात वाढ करणेसंदर्भात मोठा दिलासादाय निर्णय घेतला आहे .राज्यातील निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांचे निवृत्तीवेतनात वाढ करुन माहे नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमधील थकबाकीचे प्रदान करणेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सा.प्र.विभागाकडुन दि.19.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांना स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनात वाढ केलेल्या कालावधीपासून म्हणजे दि.01 नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या दोन महिन्याच्या कालावधीतील थकबाकीचे प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी राज्यातील स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांच्या बँकखात्यामध्ये थकबाकी जमा करणेबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

थकबाकी देय करण्याकरीता शासन निर्णयामध्ये दर्शविलेल्या विवरणपत्रानुसार एकुण 12,45,80,000/- इतका निधी वितरीत करण्यात येत आहे .सदर निधीतून सर्व स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांना थकबाकी वितरीत करणेबाबतची कार्यवाही 15 दिवसात पुर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सा.प्र.विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment