सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या सणाला मिळणार मोठे गिफ्ट ! पगारात होणार इतकी वाढ !

Spread the love

केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोन म्हणजेच जानेवारी व जुलै महीन्यात सरकारकडून डी. ए वाढ करण्यात येते . परंतु सरकारकडून लगेच डी.ए वाढ न करता एखाद्या सणासुदीच्या दिवशी डी.ए मध्ये वाढ करुन सणानिमित्त गिफ्ट देतात .नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचे आकडेवारी जाहीर करण्यात आलेले आहेत .

सदर आकडेवारींचा विचार केला असता , आता कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढ अपेक्षित होती . परंतु केंद्र सरकारने 3 टक्के वाढीलाच मंजुरी दिलेली आहे .सध्या केंद्रीय / राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे , यामध्ये आता माहे जानेवारी 2023 पासुन आणखीण 3 टक्के डी.ए वाढ होणार आहे .

होळीच्या सणाचे औचित्य साधून सणाच्या आसपास कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे .यामध्ये जानेवारी पासुन प्रत्यक्ष डी.ए वाढ लागु करुन डी.ए थकबाकीची रक्कम देखिल अदा करण्यात येणार आहे .होळी सणाला म्हणजेच माहे मार्च महिन्याच्या वेतनासोबत प्रत्यक्ष रोखीने डी.ए वाढ लागु करण्यात येईल .

पगारात होणार मोठी वाढ –

4 टक्के महागाई भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे ,म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनानुसार विचार केला असता पगारात किमान 900/- रुपये ते कमाल 21,000/- रुपयांची वाढ होणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment