जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी घेतली आता आक्रमक भुमिका ! कर्मचारी बेमुद संपावर !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा ठराव राज्य सरकारने करुन मंजुर करावा ! याबाबतचा अधिकृत्त अध्यादेश निर्गमित करण्यात यावा .राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुका जवळ आल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक भाष्य करत आहेत .

परंतु प्रत्यक्षात राज्य स्तरावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरु नसल्याने , कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने दिले जात आहेत . यामुळे आता कर्मचारी सरकारच्या या आश्वासनाला कंटाळले असून , जुनी पेन्शन बाबत ठराव मंजुर करुनच याबाबत पक्षकर्ते यांनी भाष्य करावे .असे कर्मचाऱ्यांना वाटते . जुनी पेन्‍शनची मागणी लवकरात लवकर पुर्ण व्हावी याकरीता आता कर्मचाऱ्यांकडुन आक्रमक भुमिका घेतली जाणार आहे .

येत्या मार्च महिन्यांत जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागु न केल्यास राज्य राज्यपत्रित अधिकारी / कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची भुमिका राज्यपत्रित अधिकारी महासंघाने घेतला आहे .तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत लवकरच बेमुदत संप करणेबाबत नुकतेच संघटनेची कार्यकारणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment