राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन त्याचबरोबर थकबाकी अदा करण्याकरीता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडुन निधी वितरण करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्याच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . यानुसार आता सन 2022-23 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधीला मंजुरी देण्यात आली आहे .त्याचबरोबर ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशसाठी खर्च करता येणार नसल्याचे नमुद सदर निर्णयांमध्ये करण्यात आलेले आहेत .

लेखाशिर्षनिहाय निधींची मागणी करण्यात आलेल्या नियंत्रक अधिकारी यांच्या BEAMS प्रणालीवर निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .सदरचा अर्थसंकल्पित निधी हा ज्या लेखाशिर्षाखाली मंजुर करण्यात येईल .त्याच लेखाशिर्षाली खर्ची टाकण्याचे आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आले आहे .निधी वितरण करणे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment